अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- सहजयोग ध्यान केल्याने निर्भयता वाढून मनातील भीती दूर होते असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
अहमदनगर जिल्हा सहजयोग परिवाराच्या वतीने गाव तेथे सहजयोग अभियानाच्या भीती फलकाचे उदघाटन आ. संग्राम जगताप यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी सहजयोग परिवाराचे जिल्हा समन्वयक सुधीर सरोदे, गणेश भुजबळ, प्रकाश येनगंदुल, चंद्रकांत रोहोकले, अभय ठेंगणे, संभाजी पवार व श्रीनिवास बोज्जा उपस्थित होते.
यावेळी जगताप म्हणाले सहजयोग ध्यान साधना ही ऐक दैवी शक्ती आहेे. याचा अनुभव मी स्वत: घेतला असून ही ध्यान साधना केल्याने प्रत्येक मानवात निर्भयता वाढून मनातील भीती दूर होते.
कोरोनामुळे भयभीत झालेल्या लोकांसाठी हा उत्तम उपाय आहे. यासाठी जास्तीत जास्त लोकांसमोर याची माहिती होणे आवश्यक आहे. या साठी आपण जो गाव तेथे सहजयोग अभियान सुरु केले हे कौतुकास्पद असून काळाची गरज आहे, असे जगताप म्हणाले.
ताब्यात घेऊन तीनही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved