अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :- कोपरगाव तालुक्यात ग्रामिण भागात वीज वितरण कंपनीने मीटर रिडींग घेण्याचे कंत्राट संगमनेर येथील दिलीप नरहरी चकोर यांचे चाणक्य मल्टीस्टेट सर्व्हिसेस या कंपनीला दिलेले असून
कंपनीमार्फत ग्रामीण भागात मीटर रिडींग घेण्याचे काम सुरू आहे, असे असताना दिलीप चकोर यांनी कामावरून तीन कामगारांना शिवीगाळ करून काढून टाकले.
त्यामुळे कामगार यांनी सर्वप्रकार मनसे शहराध्यक्ष सतीश काकडे यांना सांगितला. यावेळी कामगारावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी दिलीप चकोर यांच्या चाणक्य मल्टीस्टेट कंपनीबाबत व दिलीप चकोर यांच्या कंत्राटाबाबत माहिती अधिकारात माहिती मागितली होती.
याचा राग मनात धरून दिलीप चकोर व त्यांचे मित्र दिलीप अभंग, संगमनेर यांनी सतीश काकडे यांना फोनवरून तुम्ही दिलीप चकोर यांना माहितीचा अधिकार का मागितला. अरेरावीच्या भाषेत बोलून शिवीगाळ करून तू जर दिलीप चकोरला त्रास दिला तर तुझा बेत पाहतो.
तुझा गेमच लावतो, अशा भाषेत त्याने सतीश काकडे यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्यामुळे काकडे यांनी दिलीप चकोर व दीपक अभंग यांच्या विरोधात कोपरगाव पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. अजूनही त्यांना अटक झालेली नसून त्यांना लवकरात लवकर अटक व्हावी, अशा मागणीचे निवेदन कोपरगाव तहसीलदार योगेश चंद्रे यांना देण्यात आले.