गावागावांच्या विकासासाठी मनसे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :-कारण गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधारी आणि विरोधकांनी अलटून-पालटून गावाची सत्ता उपभोगली आहे, परंतु गावातील परिस्थिती काही बदलली नाही.

त्यामुळे युवकांना बरोबर घेऊन मनसे गावा-गावाच्या विकासासाठी पुढाकार घेणार आहे. पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसे आता गावपातळीवर काम करुन ग्रामपंचायत निवडणुक लढविणार आहे.

दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांसाठी नेहमीच झगडत असते. मनसेच्या पाठपुराव्यामुळे अनेक प्रश्‍न मार्गीही लागतात. शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातील प्रश्‍नांनाही मनसेने प्राधान्य दिले आहे.

नुकतेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तालुका पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. नवीन पदाधिकारी हे गावागावात मनसे झेंडा उभारतील, असे प्रतिपादन मनसे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांनी केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगर तालुका उपाध्यक्षपदी देवीदास कुलट, निंबळक विभाग अध्यक्षपदी निलेश सातपुते, नगर शेतकरी सेना तालुकाध्यक्षपदी देवीदास ढगे आदिंची नियुक्ती करुन जिल्हाध्यक्ष सचिन डफळ व सचिव नितीन भुतारे यांच्या हस्ते पत्र देण्यात आले.

याप्रसंगी तालुकाध्यक्ष चंद्रकांत ढवळे, निलेश सातपुते, रवी कळमकर, निलेश कुलट, सतीश हारदे, अक्षय गाडेकर आदि आदि उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24