अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :- झोपडीसमोर चाजींगसाठी लावलेला मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याप्रकरणी गोरख रामा चव्हाण (रा . नांदगांव, जि- नाशिक) यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा दाखल झाल्यांनतर स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली समांतर तपास करीत असताना पोनि कटके यांना गोपनिय माहीती मिळाली कि, सदरचा गुन्हा हा विजय बर्डे (रा. देवी निमगांव, ता – आष्टी) याने व त्याचे साथीदाराने मिळून केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
त्यानुसार आरोपीचे वास्तव्याबाबत गोपनिय माहिती घेवून आरोपी विजय बर्डे याला नेप्ती, ता.नगर या ठिकाणाहून ताब्यात घेतले. त्यास अधिक विश्वसात घेवून विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचा साथीदार गोरख अशोक बर्डे (रा. राहूरी खुर्द , ता- राहुरी) असे दोघांनी मिळून केला असल्याची कबुली दिली.
गुन्ह्यातील चोरलेला मोबाईल काढून दिल्याने तो जप्त करण्यात आला आहे. आरोपी गोरख अशोक बर्डे याचा पोलिस शोध घेत आहेत.
आरोपी विजय सुदाम बर्डे यास मुद्देमालासह राहुरी पोलिस ठाण्यात हजर करण्यात आलेले असून पुढील कार्यवाही राहुरी पोलिस करीत आहेत.