मोबाईल चोरणाऱ्या भामट्यांना पोलिसांनी केले गजाआड

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यातील गुन्हेगारीमध्ये वाढ होऊ लागली आहे. लुटमारी, दरोडा, चोरी आदी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण होऊ लागली आहे. दरम्यान या चोरट्याने पकडण्यासाठी पोलीसांनी देखील कंबर कसली आहे.

नुकतेच मोबाईल चोरणाऱ्या दोघा भामट्यांना पोलिसांनी गजाआड केले आहे. नगर तालुक्यातील वाकोडी फाटा ते बुरूडगाव रोडवर युवकाला मारहाण करत त्याचा मोबाईल हिसकावून नेणार्‍या दोघा चोरट्यांना भिंगार कॅम्प पोलिसांनी अटक केली आहे.

अक्षय राजेंद्र शेलार व शिवप्रसाद नारायण शिंदे (दोघे रा. सारसनगर, नगर) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. वरील दोघा आरोपींनी 16 डिसेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास राहुल रतन परमार (वय- 19 रा. वाकोडी फाटा ता. नगर) याला मारहाण केली होती.

तसेच परमार यांच्या चारचाकी वाहनाच्या आरोपीं यांनी काचा फोडल्या होत्या. त्याच्या खिशातील मोबाईल लंपास करून दोघे पसार झाले होते. तर यावेळी स्थानिक नागरिकांनी एकाला पकडून भिंगार कॅम्प पोलिसांच्या ताब्यात दिले होते.

याप्रकरणी राहुल परमार याने पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरूद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पसार असलेल्या दोघांना पोलीस पथके पकडले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24