अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील कुख्यात गुन्हेगार रामसिंग त्रिंबक भोसले आणि त्याच्या टोळी विरोधात मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.(Newasa news)
श्रीरामपूर शहर पोलिसांनी पाठविलेल्या या प्रस्तावाला नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षकांनी मंजुरी दिली आहे. नगर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.मनोज पाटील यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी
विविध गुन्हेगारांची माहिती संकलित करून ज्या संघटित गुन्हेगारी टोळ्या आहेत. त्यांच्याविरुद्ध मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्याची संकेत दिले होते.
यांच्यावर करण्यात आली कारवाई :- अजय अशोक मांडवे, प्रद्युम सुरेश भोसले, रामसिंग त्रिंबक भोसले, सचिन सुरेश भोसले, डिच्चन त्रिंबक भोसले (सर्व रा. सलाबतपुर, ता. नेवासा), समीर उर्फ चिंग्या राजू सय्यद (रा. नेवासा फाटा),
बाळासाहेब उर्फ बयंग सुदमल काळे (रा. गेवराई, ता. नेवासा), आसिफ नसीर शेख (रा. वाळुंज औरंगाबाद, हल्ली रा. सलाबतपुर, ता. नेवासा), बाबाखान शिवाजी भोसले,
सुनील बाबाखान भोसले (रा. गोंडेगाव, ता. नेवासा) आणि रकुल दशरथ चव्हाण या आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी संघटित गुन्हेगारी करणाऱ्या टोळीविरोधात मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दरोड्याचा गुन्हा हा कुख्यात गुन्हेगार रामसिंग भोसले आणि त्याच्या टोळीने केला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.
त्यानंतर या टोळी विरोधात मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यासाठी श्रीरामपूर शहर पोलिसांनी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाला परवानगी मिळाली आहे.