अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- भिंगारमधील लॉरेन्स स्वामीसह आठ जणांविरोधात जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पाठविलेल्या मोक्का प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
याबाबतची माहिती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी दिली. दरम्यान पोलिसांनी राजकीय दबावाखाली येऊन माझ्या पतीला दरोड्याच्या खोट्या गुन्ह्यात अडकवले.
दीडशे ते दोनशे पोलीसांचा फौजफाटा घेऊन घराचे दार तोडून पतीला अटक करण्यात आली. त्यांना देशद्रोही असल्यासारखी वागणूक देऊन त्यांची बदनामी करण्यात आली.
सदर प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी स्वामी यांच्या पत्नी वैशाली स्वामी यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान खंडणीच्या गुन्ह्यात लॉरेन्स स्वामीला अटक करण्यात आली आहे.
स्वामीसह प्रकाश भिंगारदिवे (रा. निंबोडी ता. नगर), संदीप शिंदे (रा. बुरुडगाव ता. नगर), विक्रम गायकवाड, बाबा उर्फ भाऊसाहेब आढाव (दोघे रा. वाळुंज ता. नगर),
संदीप वाकचौरे (रा. दरेवाडी ता. नगर), अर्जुन डूबे (रा. दरेवाडी ता. नगर) व बाळासाहेब भिंगारदिवे यांच्यावर मोक्का कायद्यान्वये कारवाईचा प्रस्ताव अधीक्षक मनोज पाटील
यांनी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. दिघावकर यांच्याकडे पाठविला होता. या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असल्याचे डॉ. दिघावकर यांनी सांगितले.
भिंगार पोलिसांनी स्वामीसह आठ जणांविरूद्ध मोक्का प्रस्ताव तयार करून तो पोलीस अधीक्षक पाटील यांच्याकडे पाठविला होता.
अधीक्षक पाटील यांनी त्यातील त्रुटी दूर करत परिपूर्ण प्रस्ताव महानिरीक्षकांकडे मंजुरीसाठी मागील आठवड्यात पाठविला होता. त्याला मंजुरी मिळाली आहे.