मोकाट जनावरांच्या मालकांना बसणार आर्थिक भुर्दंड

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 1 जानेवारी 2021 :-शहरासह जिल्ह्यात मोकाट जनावरांचा जणू उद्रेकच झाला आहे. मुख्य रस्त्यांवर हि मोकाट जनावरे ठाण मांडून बसत असल्याने अनेकदा वाहतुकीस अडथळा निर्माण होत असतो.

यामुळे आता मनपाने आक्रमक पवित्रा हाती घेतला आहे. रस्त्यावरील मोकाट जनावरे महापालिकेने पकडले अन् कोंडवाढ्यात टाकले तर मोकाट जनावरांच्या मालकांना आर्थिक चटका बसणार आहे.

कोंडवाड्यात टाकलेले जनावरे सात दिवसांत सोडून नेणे गरजेचे आहे. अन्यथा त्याचा लिलाव महापालिका करणार आहे. तसा फतवा आज गुरूवारी महापालिकेने काढला.

शहरातील मोकाट जनावरे पकडणे, कोंडवाडा करणे, देखभाल व इतर कामे करण्याचा ठेका पिंपरी चिंचवडमधील पिपल फॉर अ‍ॅनिमल या संस्थेला देण्यात आला आहे. ही संस्था रस्त्यावरील मोकाट जनावरे पकडून कोंडवाड्यात टाकणार आहे.

असा असेल दंड (प्रतिदिन, प्रतिजनावर) :-

  • बकरी, मेंढी, करडू, बोकड – 280
  • गाढव, डुक्कर, वासरू- 280
  • घोडा, गाय, गोर्‍हा, बैल, खेचर, घोडी – 360
  • उंट, म्हैस, रेडा- 920
  • हत्ती – 1020
अहमदनगर लाईव्ह 24