मोकाट जनावरांचा त्वरित बंदोबस्त करावा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :-  शहरासह उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाल्यामुळे नागरिकांना व शेतकऱ्यांना त्यांच्या त्रासाला तोंड द्यावे लागत आहे.

सारसनगर भागातील औसरकर मळा येथील शेतकऱ्यांच्या शेतीमालाचं मोकाट जनावरांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

सारसनगर भागामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात शेती व्यवसाय होत आहे. शेतकरी या परिसरात वेगवेगळी उत्पादन घेत आहेत.

मोठ्या प्रमामात मोकाट जनावरांचा सूळसुळाट झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या संकटास सामोरे जावे लागत आहे. तसेच शहरामध्ये ठिकठिकाणी रस्त्यावर मोकाट जनावरे फिरत असल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत आहे.

तसेच छोटे-मोठे अपघात होत आहेत. तरी या मोकाट जनावरांचा बंदोबस्त लवकरात लवकर करावी, अशी मागणी नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली.

सारसनगर भागातील औसरकर मळ्यातील शेतकऱ्यांच्या मालाची नुकसानाची पाहणी करताना नगरसेवक प्रकाश भागानगरे.

समवेत शेतकरी मिलिंद कानडे, संजय गाडळकर, गणेश कानडे, किरण ओऔसरकर, अनिल गाडळकर, भाऊसाहेब गाडळकर, गुडू खताळ आदी उपस्थित होते.

यावेळी शेतकरी मिलिंद कानडे म्हणाले की, सारसनगर भागातील औसरकर मळा परिसरात आमची शेती आहे. या भागामध्ये ऊस, मका, भाजीपाला अशी उत्पादने घेत असतो.

परंतु या भागात मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे फिरत आहेत. रात्री-अपरात्री येऊन शेतामध्ये जाऊन मालाचे नुकसान करत आहे.

त्यामुळे आमच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. तरी प्रशासनाने याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन शेतकऱ्यांचे होणार नुकसान थांबवावे, असे म्हणाले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24