तरुणीच्या मोबाईलवर संदेश पाठवत केला विनयभंग; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2020 :-महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये आजकाल जास्तच वाढ झालेली पाहायला मिळत आहे. अत्याचार, छेडछाड, विनयभंग अशा घटना घडू लागल्याने महिलांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे.

असाच एक प्रकार संगमनेर तालुक्यात घडला आहे. संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील एका 23 वर्षीय तरुणीच्या मोबाईलवर व्हाट्सअ‍ॅपवर संदेश पाठवून तिला लज्जा उत्पन्न होईल असे बोलून धमकी दिल्या प्रकरणी शहर पोलिसांनी मालदाड येथील तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, घुलेवाडी येथील एका 23 वर्षीय तरुणीला आरोपी संकेत यादव नवले हा 27 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर दरम्यान सतत त्याच्या मोबाईलवरुन व्हाट्सअ‍ॅपवर संदेश पाठवून लज्जा उत्पन्न होईल असे बोलून धमकी देत असत.

या प्रकरणी तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी संकेत नवले याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.फौजदार फटांगरे हे करत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24