अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :- नगर शहरातील एका हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करणारी २५ वर्षाची तरुणी, रा. अरणगाव परिसर हिची इच्छा नसतानाही आरोपी राहुल दत्तात्रय पुंड, वय २९ रा. आरणगाव ‘हा वेळोवळी तरुणीकडे लग्नासाठी विचारणा करायचा.
तिने नकार दिला तरी आरोपी राहुल दत्तात्रय पुंड हा नगर शहरातील तरुणी नर्स म्हणून काम करीत असलेल्या हॉस्पिटलमध्ये गेला.
तिथे ती ड्युटी करत असताना राहुल पुंड नर्स तरुणीस म्हणाला की, मला तुझ्याशी बोलायचे आहे तेव्हा तरुणीने स्पष्ट शब्दात नकार दिला असता
राहूल पुंड याने तरुणीचा हात भरून टॉपची बाही फाडून लजा उत्पन होईल असे वर्तन करुन विनयभंग केला. मारहाण करुन धमकी दिली.
काल ६ वा. ‘त्या’ हॉस्पिटलमध्ये हा नर्सचा विनयभंग करण्याचा प्रकार घडला. पिडीत तरुणीच्या फिर्यादीवरून आरोपी याच्याविरूद्ध कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोना पालवे हे पुढील तपास करीत आहेत.