महिलेला गाडीत टाकून नेवून विनयभंग; बंदुकीने धमकी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :-35 वर्षीय महिलेला राहुरी तालुक्यातील ताहाराबाद रोडने पांढऱ्या रंगाच्या गाडीत घालून अज्ञाथस्थळी नेवून तिच्याशी लज्जास्पद वर्तन करून विनयभंग केल्याची घटना घडली असून याबाबत महिलेच्या फिर्यादीवरून राहूरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी मनोज राजू आहेर, रा. राहूरी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, आरोपी मनोज राजू आहेर याने

दि. १७.डिसेंबर रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास ताहराबाद रोडला फॉरेस्टमध्ये राहुरी फॅक्टरी तालुका राहुरी फिर्यादीच्या शेतात घोरपडवाडी ता.राहूरी येथे फिर्यादी हि ताहराबाद रोड येथोल

सगळगिळे वस्ती यांचे वखारीत लाकडे घेण्यासाठी जात असताना मनोज राजू आहेर, रा.राहुरी यांने फिर्यादी महिलेस पांढऱ्या रंगाच्या चार चाकी गाडीत बसविले.

तसेच फिर्यादीस गाडीतून अंदाजे एक किलोमीटर ताहराबाद रोडला घेऊन जाऊन वाहन हे त्या ठिकाणातील फॉरेस्टच्या आतमध्ये घेऊन जाऊन मनोज राजू आहेर याने फिर्यादीच्या अंगावर हात टाकून फिर्यादीशी लगट करून फिर्यादीचा विनयभंग केला.

फिर्यादीने प्रतिकार केला असता त्याने गाडीचे सिट खालून राखाडी रंगाची छोटी बंदूक काढून फिर्यादीस दाखवून तू कोणाला काही सांगितले तर तुला, तुझे ठेकेदाराला गोळ्या झाडून भारून टाकीन,

असा दम दिला. यावरून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. घटनेचा पूढील तपास पोलिस निरिक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल डी.के.आव्हाड करत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24