अहमदनगर बातम्या

मोनिकाताईंना मत म्हणजेच पंकजाताईना मत ,विकास कामांसाठी महायुतीला साथ दया-डॉ. मृत्युंजय गर्जे

Published by
Ajay Patil

मतदार संघातील जाती पातीचे राजकारण करणा-या लोकांन सत्तेपासुन दुर ठेवा मतदार संघात जो काही विकास झाला आहे तो महा युतीच्या काळात झालेला असुन तो पंकजाताई मुंढे यांच्या सहकार्याने झाला आहे, मोनिकाताई यांनी देखील पंकजाताईंना आमदार होण्यासाठी मत दिलेले आहे

त्यामुळे मोनिकाताईंना मत म्हणजेच पंकाजाताई मुंढे यांना मत असे विकास कामांसाठी अनुभवी नेतृत्वाची गरज असते समजावुन मतदान करा भुलथापा मारणा-यांनी काहीच कामे केलेली नाहीत असे मत भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे यांनी चिंचपुर, ता पाथर्डी येथे महायुतीचे आमदार मोनिकाताई राजळे यांच्या प्रचार सभेमध्ये केले.

स्व.गोपीनाथ मुंढे साहेब आणि त्यांनतर पंकजाताई मुंढे यांनी मतदार संघामध्ये मोठयाप्रमाणात निधी दिला असुन जलयुक्तच्या माध्यमातुन उसतोडणी करणार या भागातील मजुर आज ऊस उत्पादक झाला आहे विकासकामे फक्त युतीसराकारच करु शकते इतरांच्या भुलथापांना बळी पडुन नका पंकजाताई मुंढे यांना राज्याच्या आणि देशाच्या राजकाराणात साथ देण्याची गरज असुन आपण मोनिकाताईना मतदान करुन त्यांना सोबत पाठविले तरच आपल्याला विकासकामांना निधी मिळु शकतो हे समजुन घेण्याची गरज आहे.

आमदार मोनिकाताई राजळे यांना कामाचा 10 वर्षाचा अनुभव आहे मंत्रालयातुन कामे आणण्यासाठी अनुभवी नेतृत्वाची गरज असते विरोधकांना ज्या संधी मिळाल्याहोत्या त्याचा वापर त्यांनी स्वता:साठी केला जनतेच्या हातामध्ये कोयता कायमराहिला याची मतदार संघातील जनतेने गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे असे मत त्यांनी यावेळी मांडले.

यावेळी तालुक्यातील चिचंपुर पांगुळ येथे महायुतीच्या उमेदवार आमदार मोनिका राजळे यांच्या प्रचाराच्या संवाद दौऱ्यावेळी बडे बोलत होते. राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष भिमराव फुंदे,भाजपचे तालुकाध्यक्ष डॉ.मृत्युंजय गर्जे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, खरेदी विक्री संघाचे संचालक भगवानराव आव्हाड,आजीनाथ पाराजी बडे,

भिमराव बडे, प्रभू बडे, सूर्यभान बडे, अर्जुन बडे,विष्णू बडे, रावसाहेब बडे, बबन बडे, आजीनाथ शिवराम बडे, आश्रुबा बडे,शिवनाथ खेडकर, आजीनाथ सीताराम बडे, रामदास आंधळे, सतीश शिरसाट,

अंकुशराव कासुळे, उमेश खेडकर, बाळासाहेब अकोलकर, भिमराव पालवे, बळीराम काकडे, दिनू भवार, वासुदेव खेडकर, श्रीकांत खेडकर, नंदू वारुंगळे, प्रदीप अंदुरे यांच्यासह महायुती घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्य संख्येने उपस्थित होते.

Ajay Patil

Published by
Ajay Patil