अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. जिल्ह्यात काही भागात वादळी वार्यासह जोरदार पावसामुळे खरीप पिके भुईसपाट झाले आहेत.
यामुळे शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कपाशी, बाजरी, तूर, फळबागा, जनावरांच्या चार्याचे व इतर उसासह सर्वच पिके जमिनीवर पडले असून शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे.
हा पाऊस राज्यात 15 ऑक्टोबरपर्यंत मुक्काम करणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. सतत पडणार्या पावसामुळे जिल्ह्याची वाटचाल आता ओल्या दृष्काळाच्या दिशेने सुरू आहे.
असा आहे हवामान अंदाज :- सप्टेंबरच्या मध्यात हवामान खात्याने पुढील चार आठवड्यासाठी पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. या अंदाजानुसार, देशभरात 15 ऑक्टोबरपर्यंत बर्यापैकी पावसाचा जोर कायम राहणार आहे. विशेषत: देशाच्या दक्षिण आणि मध्य भागात पावसाची हजेरी कायम राहणार आहे.
आज आणि उद्या 21 सप्टेंबर रोजी संपूर्ण कोकणासाठी ऑरेंज अर्लट जारी करण्यात आला आहे. तिसर्या आणि चौथ्या आठवड्यात मान्सूनचा जोर कमी होणार असला तरी याबाबतची अद्ययावत माहिती पुन्हा जारी केली जाणार आहे.
पिकांवर परिणाम :- जिल्हाभरात, ठिकठिकाणी झालेली अतिपावसामुळे खरीप पिकांची चांगलीच दाणादाण उडाली. मका, कपाशी, ऊस, सोयाबीन पिकाचे नुकसान होऊन उभी असलेले पिके भुईसपाट झाले आहे. या पावसामुळे येथील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसाने कुठे शेतात पाणी साचले.
तर कुठे बाजरी पीक भूईसपाट झाले. परिसरातील बाजरी, भुईमूग, मका, ऊस, जनावरांचा चारा आदी पिकांमध्ये पाणी साचले. सुरुवातीला जोमात आलेले कपाशीचे पीक आता मोठ्या प्रमाणात पाते गळू लागल्यामुळे धोक्यात येऊ लागले आहे. या पावसामुळे झाडांची खालची पाने लालसर-पिवळी पडू लागली आहेत.
कपाशीवर मावा-तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. काही ठिकाणी कपाशीचे पीक पाण्यात डुंबत होते. तर काही ठिकाणी जास्त पाण्यामुळे कापसाचे रोपटे वाहून गेल्याचे प्रकार घडले आहेत. पावसाचा फटका रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीवर होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागात ओढे, नाले आणि शेतात तुंडूब पाणी साचले आहे.
यामुळे शेत जमिनीत वापसा व मशागतीनंतर रब्बीच्या पेरण्यांसाठी बराच कालावधी लागणार आहे. यामुळे रब्बीच्या पेरण्यांना उशीर होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 718 मिली मीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्याच्या सरासरीच्या 110 टक्के पाऊस झालेला आहे. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी साठले असून जिल्ह्यातील लहान-मोठे सर्वच प्रकल्प ओव्हफ्लो झाले आहे. आता जिल्ह्याची वाटचाल आता आता ओल्या दुष्काळाच्या दिशेने सुरू झाली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved