अहमदनगर Live24 टीम, 27 ऑक्टोबर 2021 :- नेवासा तालुक्यातील देडगाव येथील यात्रेच्या दिवशी अपहरण झालेल्या पाच वर्षीय बालकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून याप्रकरणी नेवासा पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
या घटनेच्या निषेधार्थ एकलव्य संघटनेच्या वतीने पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. दरम्यान याबाबत सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील देडगाव येथे कोजागरी पौर्णिमेच्या दुसर्या दिवशी यात्रा होती. या दिवशी घराबाहेर खेळणारा सत्यम संभाजी थोरात हा पाच वर्षांचा चिमुरडा घरी परतलाच नाही.
त्यामुळे मुलाची कुटुंबीयांनी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर मात्र सदर मुलाची निर्घृण हत्या झाल्याचे उघड झाले. याप्रकरणी पोलिसांनी प्रमोद अंकुश थोरात (वय 42), विनायक उर्फ विनोद अंकुश थोरात (वय 44), गणेश शेषराव मोरे (वय 32) व रमेश शेषराव मोरे वय (वय 30) यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली.
चारही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. दरम्यान सदर निर्घृण हत्येचा व पोलीस प्रशासनाचा निषेध करण्यासाठी एकलव्य संघटनेच्या वतीने पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला.
शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे व नेवाशाचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की चिमुरड्याने शरीराचे तुकडे तुकडे करण्यात आले. सदरचा प्रकार हा अंधश्रद्धेतून घडलेला असल्याबाबत शक्यता मुख्य आरोपीच्या मागील वर्तनातून लक्षात येते.
दरम्यान अपहरणाच्या घटनेनंतर तपासात हलगर्जीपणा करण्यार्या व आरोपींना पाठीशी घालणार्या व पीडित कुटूंबाच्या मुलाचा तपास करण्यासाठी पैशाची मागणी करणार्या पोलीस कर्मचार्यांस तात्काळ निलंबन करून गुन्हा दाखल करण्यात यावा व संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे