आणखी चाैघांचा मृत्यू , जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :-  थंडीचा कडाका वाढू लागल्यामुळे कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोमवारी जिल्ह्यात १६० पॉझिटिव्ह आढळून आले. दिवसभरात कोरोनामुळे आणखी चाैघांचा मृत्यू झाल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.

नवे रुग्ण वाढण्याची शक्यता गृहित धरून मंगळवारपासून महापालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत संचारबंदी लागू होणार आहे. ब्रिटनमध्ये नवी लक्षणे असलेले रुग्ण आढळल्याने येथील प्रशासनही सतर्क झाले आहे.

मागील दोन महिन्यांपासून नगर शहर व जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या कमी होत होती. थंडीची लाट पुन्हा आल्याने रुग्ण आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात दररोज २०० पेक्षा कमी रुग्ण आढळून येत असले, तरी हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

मागील २४ तासांत जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ३०, खासगी प्रयोगशाळेत ४९ आणि अँटीजेन चाचणीत ८१ बाधित आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळलेल्या रुग्णांमध्ये मनपा हद्दीतील १२, जामखेड २, कर्जत १, पारनेर ३, राहाता ५, राहुरी ३, संगमनेर २, श्रीगोंदे १, इतर जिल्ह्यातील १ रुग्णाचा समावेश आहे.

अहमदनगर लाईव्ह 24