अहमदनगर बातम्या

पाथर्डी मतदारसंघामध्ये आमदार मोनिकाताई यांच्या माध्यमातून शंभर कोटींपेक्षा जास्त निधी

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या केंद्र सरकारच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले असल्याचे मत खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले.

कोरडगाव येथे ‘शासन आपल्या दारी’ योजनेंतर्गत पाथर्डी तहसील कार्यालय व पंचायत समितीच्या वतीने विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्र वाटप व विविध विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.

सदर कामांचे भूमिपूजन खा. विखे पाटील व आमदार मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते झाले. या वेळी विखे यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. टक्केवारी न घेता महसूल विभागाच्या सर्व योजना गोरगरीब लोकांपर्यंत पोहोचवल्या, जिल्हा परिषदेमार्फत प्रत्येक गावाला दहा लाख रुपयांचा निधी दिला.

कोणाला टक्केवारी न देता गावातील कामे सुरू झाली. कोरोनानंतर अवघ्या एका वर्षात नॅशनल हायवे ६१ देखील पूर्ण केला, असे विखे यांनी स्पष्ट केले. दीड वर्षाच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून शेगाव- पाथर्डी मतदारसंघामध्ये आमदार मोनिकाताई यांच्या माध्यमातून शंभर कोटींपेक्षा जास्त निधी आणला, असेही त्यांनी बोलताना सांगितले.

याआधीसुद्धा नगर जिल्ह्यात महसूल मंत्री पद होतं, पण गरिबांना अशा पद्धतीच्या योजनेचा लाभ त्यांना देता आला नाही, असा टोला विखेंनी विरोधकांना लगावत नेतृत्वात बदल झाला की, सर्वसामान्य नागरिकांपर्यंत योजना पोहोचतात, असे मत मांडले.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राहुल राजळे, अभय आव्हाड, दिलीप भालसिंग, तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, महिला तालुकाध्यक्ष काशीबाई गोल्हार, विष्णुपंत अकोलकर, अजय रक्ताटे, मधुकर देशमुख, नारायण काकडे, दामू काकडे, साखरबाई म्हस्के, बाळासाहेब देशमुख, भोरू म्हस्के तसेच अधिकारी, ग्रामस्थ आणि लाभार्थी उपस्थित होते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office