अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :-गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना सक्रिय होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान कोरोनाची वाढती आकडेवारी पाहता नगरकरांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पाहायला मिळते आहे.
एकीकडे कमी होणारे कोरोनाबाधितांची आकडेवारी दिवाळीनंतर पुन्हा वाढत असल्याचे दिसून येत आहे. संगमनेर तालुक्यात तीन दिवसांत १२३ रुग्ण आढळल्याने कोरोना बाधितांची संख्या ५ हजारांच्या पुढे गेली आहे.
शहरात १४०३, तर ग्रामीणमध्ये ३६७२ असे ५०७५ बाधित आतापर्यंत आढळले. गेल्या २४ तासात ५० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. ४७५३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
तसेच तालुक्यात सध्याच्या स्थितीत २७९ जणांवर सध्या उपचार सुरु असून ४३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. एप्रिल ८, मे ३६, जून ६५, जुलै ६५०, ऑगस्ट ९६१, सप्टेंबर १५२९, ऑक्टोबर १०४१ बाधित आढळले होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved