कोरोनामुळे जिल्ह्यात हजाराहून अधिकांचा मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून कमी होताना दिसून येत होता. तसेच कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत असताना नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना फैलावत आहे.

दरम्यान जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाला असली मात्र हलगर्जीपणा करू नका असे प्रशासनातर्फे वेळोवेळी आवाहन केले जात आहे. फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यात आलेल्या या महामारीने धुमाकूळ घातला आहे.

लागण झालेली आणि मृतांची संख्याही लक्षणीय आहे. तब्बल एक हजार जणांचा जीव कोरोनाने घेतला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या जिल्ह्यात रुग्णांची संख्या एक हजार पार झाली.

जिल्ह्यात काल दिवसभरात 151 कोरोनाबाधित आढळून आले. त्यामुळे बाधितांची संख्या 66 हजार 678 झाली. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 64 हजार 462 झाली. मृत रुग्णांची संख्या 1001 झाली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24