अहमदनगर बातम्या

राज्यात सर्वाधिक बस नगर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यातून धावतायत

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 26  डिसेंबर 2021 :- शासनात विलानीकरांच्या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. यामुळे सर्वसामान्यांचे मोठे हाल होत आहे. यातच कारवाईच्या भीतीने काही ठिकाणी बससेवा सुरु झाली आहे.

यातच राज्यातील सर्वाधिक बस या अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातून धावल्या आहेत. एसटी प्रशासनाच्या आवाहनाला अहमदनगर जिल्ह्यात प्रतिसाद चांगला मिळाला आहे.

यामध्ये आतापर्यंत १०८ बस सुरू झाल्या आहेत. यामध्ये शेवगाव आगाराने राज्यात आघाडी घेतली आहे. तेथे सर्वाधिक बस शेवगावमधून धावत आहेत. विविध मागण्यांसाठी कर्मचारींनी आंदोलन हाती घेतल्याने सध्या प्रवाशांची गौरसोय होत आहे.

कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य झालेल्या असून काही मान्य झालेल्या नाहीत. त्यामुळे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनामुळे एसटीची सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे.

आजअखेरपर्यंत एसटीचे ११३८ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. सध्या जिल्ह्यात खासगी वाहतूक जोमाने सुरू आहे. त्याचा फटाका आगामी काळात एसटीला बसणार आहे.

संपामुळे एसटीच्या अहमदनगर विभागाला सुमारे ३० कोटींपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. बससेवा हळूहळू सुरु होऊ लागली आहे.

यातच राज्यातील आगारांमध्ये सर्वाधिक बस शेवगाव तालुक्यातून धावत आहे. रोज सुमारे आठ हजार किलो मीटर प्रवास करतात.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office