तरुणीचा विनयभंग करून सासूला मारहाण !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-संगमनेर शहरातील अकोले नाका परिसरात राहणारी एक १९ वर्षाची विवाहित तरुणी दुपारी ४ च्या सुमारास घरात एकटी असताना तेथे नात्यातील आरोपी दातीर बाबामिया शेख, समीर दातीर शेख, अशोक शौकत शेख, मलेखा रमजान पठाण, सर्व रा. मदिनानगर, संगमनेर हे आले व त्यांनी तरुणीला तुझी सासू व पती हे आम्हाला तुम्ही रहात असलेली जमीन देत नाही, असे म्हणत तुझ्याकडे पहातो असे धमकावून अंगावरील कपडे फाडून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विनयभंग केला.

डोक्यात काठी त गज मारला जीवे मारण्याची धमकी दिली. सासू सोडविण्यास आली असता त्यांनाही मारहाण करुन जखमी पीकेले. काल याप्रकरणी विवाहित तरुणीच्या फिर्यादीवरून नातेवाईक असलेले आरोपी दातीर बाबामिया शेख,

समीर दातीर शेख, अश्पाक शौकत शेख, मलेखा रमजान पठाण यांच्याविरुद्ध संगमनेर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोनि देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24