Ahmednagar News : अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत मोटारसायकल चोरणारी टोळी जेरबंद केली आहे. धक्कादायक म्हणजे त्यांच्याकडून थोडा नव्हे तर 22 लाख 82 हजार रुपये किमतीच्या 30 मोटारसायकली असा मुद्देमाल हस्तगत केलाय. महिला साथीदारांच्या मदतीने ही टोळी मोटार सायकल चोरायची.
शिर्डीसह जिल्ह्यात विविध ठिकाणी मोटारसायक चोरांनी धुमाकूळ घातला असल्याने पोलिसांनी त्या अनुशंघाने कारवाई सुरु केली होती. याच दरम्यान पोलिसांना गुप्त बातमी मिळाली की, अन्वर मन्सुर शेख (रा. पानमळा, कोपरगाव) हा चोरीची मोटारसायकल घेऊन सावळीविहीर फाटा येथे थांबला आहे.
पोलिसांनी येथे सापळा लावून त्यास ताब्यात घेतले. त्याने बबन धोंडीराम मोगरे, शाहीस्ता मन्वर अली सय्यद, माया दिनेश चौधरी, अंकुश भावसिंग चव्हाण यांसह विविध तालुक्यांत चोऱ्या केल्याचे कबूल केले. पोलिसांनी बबन धोंडीराम मोगरे,
अंकुश भावसिंग चव्हाण, अन्वर मन्सुर शेख या तिघांना ताब्यात घेतले. शाहीस्ता मन्वर अली सय्यद, माया दिनेश चौधरी या दोघी फरार आहेत. स्थानिक गुन्हे शाखेतील उपनिरीक्षक तुषार धाकराव, बाळासाहेब मुळीक, भाऊसाहेब काळे,
अतुल लोटके, रवींद्र कर्डिले, गणेश भिंगारदे, संदीप चव्हाण, संतोष खैरे, फुरकान शेख, विजय ठोंबरे, बाळासाहेब गुंजाळ, रणजित जाधव, चालक उमाकांत गावडे आदींनी ही कारवाई केली.
* नगर शहरात चोरीचे सत्र, नागरिक हैराण
शहरातील कोतवाली, तोफखाना परिसरात दररोज तीन ते चार मोटर सायकल चोरीच्या घटना घडत आहेत. परंतु पोलिसांना या चोरट्यांचा तपास कधी लागतो तर कधी लागताही नाही. या चोरीच्या सत्राने नागरिक मात्र दहशतीखाली असून त्रस्त झाले आहेत.