अहमदनगर बातम्या

अपघातात मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू

Published by
Ajay Patil

२२ जानेवारी २०२५ हातगाव : पैठण-पंढरपूर या राष्ट्रीय पालखी मार्गावर हातगाव शिवारात अरुंद रस्त्यावर अज्ञात वाहनाची धडक बसल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला तर सोबतची महिला जबर जखमी झाली.महादेव मुरलीधर जऱ्हाड, असे मयताचे नाव आहे. हा अपघात सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडला.

याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, महादेव मुरलीधर जऱ्हाड (वय ३५, रा. बोरगाव बु., ता. गेवराई. जि. बीड व शिवकन्या लक्ष्मण डुकरे (वय ४५) हे दोघे मोटारसायकल क्र.टिव्ही एस स्टार एमएच २०- सीडी ७४०६ हे दोघेजण दुचाकीवर सायंकाळी साडे सातच्या सुमारास बोधेगावच्या दिशेने जात होते.

सुरेश घोरतळे यांच्या घराजवळ अरुंद रस्त्यावर ऊसतोडणी कामगार असलेले महादेव मुरलीधर जऱ्हाड यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाची जबर घडक बसली. या वेळी झालेल्या अपघातात महादेव जऱ्हाड जागीच ठार झाले तर सोबतची महिला गंभीर जखमी झाली.अपघातानंतर वाहन चालक वाहनासह पसार झाला.

अरुंद रस्त्यामुळेच हा अपघात घडल्याची चर्चा या वेळी उपस्थित असणाऱ्या नागरिकांतून होताना ऐकवयास मिळाली.अपघाताचा आवाज आल्याने जवळच असलेले शेतकरी व ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले.जखमी महिलेला तातडीने पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.ग्रामस्थानी घटनेची माहिती बोधेगाव पोलीस दूरक्षेत्राला दिली.पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

Ajay Patil