अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होताना दिसत आहे, तसेच जिल्ह्यातील रुग्ण रिकव्हरी रेट देखील चांगलाच सुधारला आहे. यातच जिल्ह्यातील एका तालुक्यातून अत्यंत दिलासादायक बातमी समोर येत आहे.
जामखेड तालुक्यात गेल्या पाच दिवसांमध्ये केवळ एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. तर सध्या आरोळे हॉस्पिटल येथील कोविड सेंटर मध्ये फक्त दोन रुग्णच उपचार घेत आहेत.
जामखेड शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसुन येत आहे. आतापर्यंत जामखेड तालुक्यात १९९७ रुग्णांनी कोरोनावर मात करुन घरी परतलेत आहेत.
त्यामुळे ही जामखेडकरांसाठी खुपच दिलासादायक बातमी आहे. मात्र तरी देखील नागरीकांनी मास्क व सुरक्षित अंतर ठेवून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.