खासदार डॉ सुजय विखे म्हणाले …तर भविष्यात ‘लोकप्रतिनिधी होण्यास कोणाला रस राहणार नाही !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :-लोकप्रतिनिधी हे जनतेने निवडून दिलेले असतात. त्यामुळे लोकप्रतिनिधींची भूमिका ही लोकांच्या हिताची असते, असे नव्हे तो लोकांचाच आवाज असतात, जर अधिकारी स्वत:च सर्व निर्णय घेणार असतील तर भविष्यात कोणीही लोकप्रतिनिधी होणार नाही.

अधिकाऱ्यांनाच जर सर्व करायचे असेल तर त्यांनी राजीनामे देऊन निवडणूक लढवाव्या, अशी परखड टिका प्रशासनावर करत खा.डॉ.सुजय विखे यांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे वेळ मागितली असून लवकरच त्यांची भेट घेवून याबाबत त्यांच्याकडे कैफियत मांडणार आहे असे सांगितले.

मुळा-प्रवरा वीज संस्थेच्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर पञकारांशी बोलताना खा.डॉ. सुजयदादा विखे पाटील म्हणाले, मी गेल्या महिन्याभरापासून जिल्हाधिकाऱ्याशी बोलतोय ते माझे ऐकून घेतात. मात्र ‘ऐकत’ नाही. मी विरोधी खासदार असलो तरी सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढत आहे.

रॅपिड टेस्ट या विश्‍वासार्ह नाही. त्याची टक्केवारी फार कमी आहे. त्यामुळे टेस्ट घेणे महत्वाचे आहे. याबाबत आपण अनेक सुचना केल्या आहेत. मात्र, त्याची दखल घेतली जात नाही. जे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत, परंतु त्यांना कुठलाही त्रास नाही,

अशा रुग्णांना होम कॉरंटाईन करण्यास परवानगी देण्यात यावी,अशी परवानगी देण्यात यावी अशी मागणीचे पत्र आजच आपण जिल्हाधिकार्‍यांना पाठविले आहे. खाजगी रुग्णालये डॉक्टर देण्यास तयार आहेत. परंतु केंद्र सरकारकडून 20 कोटी रुपये येऊनही आणि त्यापैकी 4 कोटी रुपये नर्सिंग व इतर स्टाफसाठी असताना नर्सिंग स्टाफ उपलब्ध होत नाही,

ही समस्या आहे. याबाबतही आपण अधिकाऱ्यांशी बोललो. मात्र निर्णय काही होत नाही. त्यामुळे कोरोनासारख्या महाभयंकर साथीच्या काळात अधिकारी स्वत:च सर्व निर्णय घेत असतील,

लोकप्रतिनिधींचे ऐकत नसतील तर भविष्यात ‘लोकप्रतिनिधी होण्यास कोणाला रस राहणार नाही. ही सर्व परिस्थिती आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे मांडणार आहोत. त्यासाठी आपण त्यांच्याकडे वेळही मागितली असल्याचे खा.डॉ.सुजय विखे यांनी सांगितले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24