खासदार लंके स्पष्ट बोलले : सरकारच्या ‘या लाडक्या’ योजना म्हणजे निवडणुकीसाठी वापरलेले गाजर; मात्र अशा योजना नव्हे तर ‘हे’ आहे आपले व्हिजन ..!

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : सरकारच्या नवनवीन योजनांचे आम्ही स्वागत करतो परंतु या लाडक्या योजना म्हणजे निवडणुकीसाठी वापरलेले गाजर असून, सरकारने नवनवीन योजना आणण्याऐवजी, आहे त्याच योजना जर व्यवस्थित राबवल्या तर नवीन योजनांची गरज पडणार नाही, अशी टीका खासदार निलेश लंके यांनी केली.

शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे शुक्रवारी (दि.१९) सायंकाळी बन्नोमां दर्गा या ठिकाणी बोधेगावसह परिसरातील लोकनेते निलेश लंके प्रतिष्ठानच्या युवकांच्या वतीने नगर दक्षिणचे खासदार निलेश लकि यांच्या नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की,नगर जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात शाश्वत पाण्याचे सोर्स कसे निर्माण करता येईल, हे माझे व्हिजन असून, जिल्ह्यात भेडसवणारा बेरोजगारीचा प्रश्नदेखील कसा दूर करता येईल, याकडे माझे पूर्ण लक्ष केंद्रित आहे.

या भागातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव कसा मिळेल, या दृष्टीने माझा पाठपुरावा सुरू आहे. त्यासाठी लवकरच मंत्रालयात आवाज उठविणार आहे. तसेच या भागातील गोरगरीब सर्वसामान्य रुग्णांसाठी अद्ययावत हॉस्पिटलची उभारणी करणार आहे.

कारण तरुणाचे प्रेम व तुमच्या पाठबळावरच मी अहमदनगर दक्षिणचा खासदार झालो. आपली ओळख नाही, पाळख नाही, अनोळखी काही करीत नाही, परंतु आपले काही त्रऋणानुबंध असल्याशिवाय तुम्ही मला या निवडणुकीत सहकार्य केले, मला तुमची सेवा करण्याची संधी दिली, या ऋणातून मी कधीही मुक्त होऊ शकणार नाही.

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात मिनी एमआयडीसी उभारणार असल्याचे देखील खासदार निलेश लंके यांनी सांगितले. यावेळी या कार्यक्रमास मोठ्या संख्यने नागरिक उपस्थित होते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office