खासदार सुजय विखे यांनी केली भविष्यवाणी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :- महाविकासआघाडी सरकारमध्ये मतभेद असल्याचे समोर आले होतं.

राज्याचं नगर विकास खातं निधी वाटप करताना भेदभाव करत असून काँग्रेसच्या आमदारांना जाणूनबूजून निधी देण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप काँग्रेस आमदारांनी केला होता.

यावरून त्यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. यावरून आता भाजपचे खासदार सुजय विखे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. सुजय विखे म्हणाले,

आता एका पक्षाची नाराजी बाहेर आली आहे, मात्र पुढच्या काळात सर्वच पक्षाची नाराजी बाहेर येईल. तसेच काँग्रेस चौथ्या नंबरचा पक्ष असून त्यांना लॉटरी लागली आहे.

मात्र तरीही त्यांचे तिकीट कोणी फाडत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. सुजय विखे म्हणाले की, ’’तीन पक्षांच्या सरकारमध्ये सर्वांचे समाधान करणे अवघड असते.

तसेच ज्या खात्याचा मंत्री त्याच पक्षाचे काम होते. त्यामुळे बाकीचे नाराज होतात. हे सर्व स्वार्थासाठी एकत्र आले आहे. मंत्री समाधानी आहेत. मात्र आमदार नाराज आहेत.

महाराष्ट्राचा विकास थांबेल त्यांचा जो काही अंतर्गत प्रश्न आहे तो त्यांनी सोडवून घ्यावा. तसेच आता एका पक्षाची नाराजी बाहेर आली आहे.

मात्र पुढच्या काळात सर्वच पक्षाची नाराजी बाहेर येईल,’’ अशी भविष्यवाणी खासदार सुजय विखे यांनी केली आहे. नगरविकास खात्याच्या निधी वाटपामध्ये काँग्रेसच्या बाबतीत दुजाभाव केला जात असल्याने काही आमदारांमध्ये नाराजी होती. याबाबत त्यांनी बोलूनही दाखवले होते.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24