अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- आमच्या विरोधकांना नशिबाच्या जोरावर योगदानाच्या तुलनेत दुपटीने संधी मिळाली आहे. आमच्या वाट्याला मात्र संघर्ष आला आहे.
सध्या लोक मला दोनच प्रश्न विचारतात की तुम्ही केंद्रात मंत्री होणार का? आणि राज्याच्या सरकारमध्ये बदल होणार का? साईबाबांच्या कृपेने जर मी केंद्रात मंत्री झालो, तरीही आहे असाच कार्यकर्त्यांसोबत राहीन.
असे प्रतिपादन खासदार सुजय विखे यांनी केले आहे. दरम्यान विखेंच्या कुटुंबातील स्व.बाळासाहेब विखे हे दीर्घकाळ खासदार होते.
काही काळ केंद्रीय राज्यमंत्रीही होते. त्यांचे चिरंजीव आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे राज्याच्या राजकारणात, तर त्यांचे वडील देशाच्या राजकारणात असेच जणू वाटत होते.
बाळासाहेब विखे पाटलांच्या निधनानंतर त्यांचे नातू डॉ.सुजय भाजपकडून खासदार झाले आहेत. त्यामुळे ते आता देशाच्या राजकारणात सक्रीय राहणार, असे मानले जाते.
खासदारकीची पहिलीच टर्म असतानाही त्यांना आता मंत्रिपदाचे वेध लागले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या चर्चा सध्या सुरू आहेत.
अशातच गेल्या आठवड्यात खासदार डॉ.विखे आणि त्यांचे वडील राधाकृष्ण यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री शहा यांची भेट घेतली. याभेटीनंतर विखेंचे शिर्डीत केलेले मंत्रीपद बाबतचे सूचक वक्तव्य यामुळे जिल्ह्यात याबाबत चर्चा सुरू झाली आहे.