खासदार सुजय विखे म्हणाले पर्यटन विकासाला चालना देण्यासाठीही सर्वांनी एकत्र येण्याची गरज

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :-देशपातळीवर नगर जिल्ह्याची एक वेगळी ओळख आहे. येथील युवक शहराच्या प्रगतीसाठी उत्स्फूर्त सहभाग घेत आहेत. जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठीही सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन खासदार डाॅ. सुजय विखे यांनी नुकतेच केले.

नगर जल्लोष ट्रस्टच्या संकल्पनेतून आणि हॉटेल द व्हिलेजच्या सहकार्याने जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची माहिती असलेल्या ‘आपलं अहमदनगर’ या पुस्तकाचे प्रकाशन खासदार विखे व आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले.

यावेळी अॅड. धनंजय जाधव, मनपा सभागृह नेते मनोज दुलम, श्रीरामपूरचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, उडान फाउंडेशनचे जितेंद्र तोरणे आदी मान्यवर उपस्थित होते.

खासदार विखे म्हणाले, ‘आपलं अहमदनगर’ हे पुस्तक नगरच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरेल. नवीन व्यावसायिकांनाही आपला व्यवसाय वाढवण्यासाठी त्याची मदत होईल.

आमदार जगताप म्हणाले, नगर शहराला धार्मिक व ऐतिहासिक वारसा लाभला आहे. शहराच्या पर्यटनाला चालना मिळाल्यास व्यवसाय वाढण्यासही मदत होईल.

शहराच्या नावलौकिकात भर टाकण्यासाठी प्रत्येकाने सकारात्मक विचार मांडणे गरजेचे आहे. तसे झाल्यास येत्या दोन वर्षांत नगरचे रूप बदललेले दिसेल.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24