खासदार विखे म्हणाले के.के रेंज बाबत वस्तुस्थिती जनतेसमोर मांडणार !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :-के.के रेंज अर्थात खारे कर्जुने रेंज संदर्भात विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी संरक्षण मंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिले केके रेंजसाठी भूसंपादन होणार नसल्याची माहिती स्थानिक वृत्तपत्रांना दिली. सर्वप्रथम या प्रश्नासंदर्भात आपण माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना सोबत घेऊन केंद्रीय संरक्षण मंत्र्यांना भेटून विस्तृत चर्चा केली आहे.

शेतकऱ्यांच्या व्यथा केंद्रीय संरक्षण मंत्र्यांना अवगत केलेल्या होते . केवळ संरक्षणमंत्री नव्हे तर देशाचे लष्कर प्रमुख श्री मुकुंद नरवणे त्यांच्याशी देखील चर्चा करून सकारात्मक दृष्टिकोन ठेवून निर्णय घेण्याची विनंती केली.

स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधून त्याबाबतची मते जाणून घेतल्यानंतरच कुठल्याही प्रकारची कारवाई करण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री महोदयांनी दिले होते.

केके रेंज च्या जमिनी संपादित होणार आहेत की नाहीत त्यासाठी शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळण्यासाठी वेळ प्रसंगी आपण आपली न्यायालयीन लढा उभारण्याची सुद्धा तयारी केली आहे हे मी वारंवार जनतेला सांगितलेले आहे.

या प्रश्नासंदर्भात आपण राहुरी, पारनेर आणि नगर तालुक्यातील 23 गावांमधील शेतकऱ्यांबरोबर मागील महिन्यात संवाद साधला होता.

नुकतेच माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने संरक्षण मंत्र्यांची भेट घेतल्यानंतर के के रेंज साठी जमीन संपादित होणार नसल्याचे वृत्त स्थानिक वृत्तपत्रमध्ये छापून आल्याचे समजले.

याबाबतचा वस्तुस्थितीदर्शक खुलासा व माहिती कागदपत्रांच्या आधारे आपण लवकरच संसदेचं पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर मांडू व के के रेंज जमिनीचे संपादन होणार की नाही यासंदर्भात याबाबतचा संभ्रम दूर करू असे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24