अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :- नगर तालुक्यातील अनेक गावांमध्ये महावितरण कंपनीच्या वतीने बिलांच्या वसुलीसाठी अनेक रोहित्र बंद करण्यात आल्याने शेतकरी हतबल झाले असून, महावितरण कंपनीने पठाणी वसुली थांबविण्याची मागणी शेतक-यांकडुन करण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगर तालुक्यातील जेऊर परिसरात महावितरण कंपनीकडून थकबाकीच्या वसुलीसाठी रोहित्र बंद करण्याचा धडाका धरण्यात आला आहे.
रोहित्र बंद केल्याने विद्युतपंपाबरोबर घरातील वीज ही बंद करण्यात आल्याने गाव अंधारात बुडालेले आहे. अगोदरच ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकांबरोबरच इतर पिकांना विवीध रोगांनी ग्रासले आहे.
महागडी औषधे फवारणी करुन कसेबसे पिक वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न शेतक-याकडुन सुरु असुन त्यातच महावितरण कंपनीच्या वतीने रोहित्र बंद करण्यात आल्याने शेतकरी हतबल झाला आहे.