मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसमवेत आशुतोष काळेंचा मुंबई – शिर्डी विमानप्रवास

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे झालेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार,

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोपरगाव मतदारसंघातील जनतेच्या वतीने आ. आशुतोष काळे यांनी स्वागत केले.

तत्पूर्वी सकाळी आ. आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार यांच्या समवेत मुंबई ते काकडी विमान प्रवास केला. यावेळी मतदारसंघाच्या विकासाच्या विविध समस्या व अडचणींबाबत मंत्र्यांशी चर्चा करून मतदारसंघासाठी निधीची मागणी केली आहे. मागणीला सर्वच मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन कोपरगाव मतदारसंघाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाहीए अशी ग्वाही दिल्याचे आ. काळे यांनी सांगितले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत शिर्डी- मुंबई विमान प्रवासात आ. आशुतोष काळे.