अहमदनगर बातम्या

मनपाला मिळाले एकाच दिवशी ३ कोटी २८ लाख..? कसे ते वाचा सविस्तर…..!

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर महानगरपालिका आणि जिल्हा न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमाने मालमत्ता कराची प्रकरणे तडजोडीसाठी आयोजित केलेल्या महालोक अदालतमध्ये

शहरातील मालमत्ताधारकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवत एकाच दिवसात तब्बल ३ कोटी २८ लाख रूपयांचा मालमत्ता करापोटी भरणा करण्यात आला आहे.

यात १ कोटी ७५ लाख रूपयांची माफी नागरिकांनी घेतली. मालमत्ताकराची प्रकरणे तडजोडीसाठी काल महालोक अदालत ठेवण्यात आली होती.

यासाठी २० हजार पेक्षा जास्त मालमत्ता कर असलेल्या १६००० मालमत्ता धारकांना नोटीस देण्यात आल्या होत्या. कोरोना महामारीच्या काळात आर्थिक अडचणीत आलेल्या

नागरिकांना सहकार्याच्या भूमिकेतुन महानगरपालिकेने शास्तीवर ७५% आणि चालू बिलावर 8% सूट देण्यात आली होती. फक्त एक दिवस शास्तीमाफी दिली असल्याने

१०५० प्रकरणात एकाच दिवसात ३ कोटी २८ लक्ष रुपयांचा भरणा महापालिकेच्या तिजोरीत झाला. सदर सूट बाबत नागरिकांना विविध माध्यमांद्वारे

आवाहन करण्यात आले होते व रोख भरणा,चेकद्वारे,ऑनलाईन आणि मोबाईल ॲपद्वारे भरणा करण्यासाठी पर्यायही उपलब्ध करून देण्यात आले होते.

Ahmednagarlive24 Office