अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :-शहरातील काही भागात रस्त्याचे काम सुरू आहे. डांबरीकरण, पॅचिंगचे कामे केली जात आहेत.
ही कामे सुरू असतानाच स्थानिक नागरिक डांबरीकरणारवर पाणी सोडतात. व्यवसाय करणारे देखील पाणी टाकून रस्ता साफ करतात. परंतु रस्त्यावर पाणी टाकणे हे योग्य नाही.
पाण्यामुळे डांबर आणि खडी वेगवेगळे होता. मात्र आता रस्त्यावर पाणी सोडल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.
सावेडीतील आणि शहर गावठाण परिसरातील काही नागरिकांना याप्रकरणी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नागरिकांकडून रस्त्यावर पाणी सोडण्याचे प्रकार वारंवार घडत असल्यानेआता महापालिकेने दंडात्मक कारवाईबरोबर फौजदारी कारवाईचा इशारा दिला आहे.
रस्ते खराब झाल्याने महापालिका प्रशासन आणि लोप्रतिनिधांनी नागरिकांचा रोषाला सामोरे जावे लागते. याशिवाय रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात होतात. त्यामुळे रस्त्यावर पाणी सोडू नये असे आवाहन महापालिकेने केले आहे.