अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 : कोरोनाचे संक्रमण महाराष्ट्रात लक्षणीय आहे. आता याचा शिरकावं ग्रामीण भागातही व्हायला लागला आहे. अहमदनगरमध्ये मागील आठ दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
यासाठी नगरमध्ये अनेक नियम बनविण्यात आले आहेत. परंतु अनेक लोक बेफिकिरीने वागताना दिसतात. यासाठी मास्क न वापरणारे, तसेच नियमबाह्य दुकाने सुरू ठेवणाऱ्यांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे.
दक्षता पथकाने सोमवारी दिवसभरात ३५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. रविवारपर्यंत जवळपास दीड लाखांचा दंड वसूल करण्यात आला होता. तीन दिवसांत या पथकाने शहरात फिरून १ लाख ७५ हजार रुपयांचा दंड वसुल केला आहे.
शहरासह उपनगरांतही कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत़. महापालिकेने उपाययोजना करण्याबरोबरच दुकाने वेळपूर्वी सुरू करणारे व मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याची मोहीम उघडली आहे.
मास्क न वापरणार्यांना ५०० रुपये दंड केला जातो. याशिवाय रात्रीच्यावेळी रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येत आहे. त्यासाठी महापालिका, महसूल आणि जिल्हा परिषद अधिकारी कर्मचाऱ्यांचे पथक नेमण्यात आले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews