थकबाकीदारांना महापालिकेचे ‘हे’ गिफ्ट ; त्वरित घ्या फायदा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :-  कोरोना संकटामुळे जनसामान्यांचे उत्पन्न घटले. आर्थिक चक्र फिरायचे थांबले. अशातच नगरपालिकेची पट्टी भरताना जनसामान्यांची हाल होणार आहे त्यामुळे त्यांना महापालिकेने शास्तीमाफी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली होती.

आता दिवाळीच्या तोंडावर महापालिकेने नगरकरांना शास्तीमाफीची घसघशीत भेट दिली आहे. नोव्हेंबर महिन्यासाठीच शास्तीमाफीचा निर्णय असून तब्बल 75 टक्के शास्तीमाफी मिळणार आहे.

आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी ही माहिती दिली. नगरकरांना थकबाकी भरून शास्तीमाफीचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

ही बाब थकबाकीदारांसाठी चांगली आहे. परंतु जे नियमीत मालमत्ता कर भरतात त्यांना काय? असा सवाल करत त्यांनाही सवलतीचा लाभ मिळावा अशी मागणी नगरसेवक विनीत पाऊलबुधे, सुनील त्रिंबके आदींनी केली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24