अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :- आषाढी एकादशी बकरी ईद गुरूपौर्णिमा आदि सण, महत्वाचे कार्यक्रम लक्षात घेवुन कोपरगांव शहरवासियांच्या पिण्यांच्या पाण्यांसंदर्भात गेल्या एक महिन्यांपासून नियोजन करावे.
म्हणून सातत्यांने आपण ओरड करत असतांनाही सत्ताधारी नगराध्यक्ष हे आमदार आशुतोश काळेंच्या हातातील बाहुले बनुन त्यांच्याच तालावर नाचत आहेत त्यामुळेच एैन पावसाळयात कोपरगांव शहरवासियांवर 8 ते 12 दिवसाआड पिण्यांच्या पाण्यांचा बाका प्रसंग उदभवत आहे.
त्यांच्या या कृतीचा निषेध करत असल्याचे पत्रक पाणीपुरवठा समितीच्या सभापती सुवर्णा विवेक सोनवणे यांनी प्रसिध्दीस दिले आहे.
आमदार आशुतोश काळे व त्यांच्या बगलबच्च्यांनी निळवंडे बंदिस्त पाईपलाईनला घातलेला खोडा आणि 42 कोटी रूपयांची पिण्यांच्या पाण्यांची योजना नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या निश्क्रीयतेमुळे रखडल्यांनेच शहरवासियांवर ही वेळ येवुन ठेपली आहे असेही त्या म्हणांल्या.
हे पाप ही मंडळी आता कुठे फेडणार – सौ. सुवर्णा विवेक सोनवणे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, उपलब्ध पाण्यांचे नियोजन करून शहरवासियांना 3 ते 4 दिवसाआड पाणी द्यावे म्हणून आम्ही सर्वांनी मागणी केली आहे.
एकीकडे पाणी नाही म्हणून शहरवासियांचे हाल करायचे अन दुसरीकडे आमदारांनी पाटपाण्यांचे आर्वतन सोडवुन श्रेय लाटायचे हि मिलीजुली जनतेसमोर दाखविण्यांचे नाटक नगराध्यक्ष विजय वहाडणे व त्यांची मंडळी करत तर नाही ना असा प्रश्न उपस्थित करून त्या पुढे म्हणांल्या की,
कोेपरगांव शहर विकासाच्या प्रत्येक ठरावाला पालिका सभागृहात आम्ही सर्व भाजपा सेना नगरसेवक गटनेत्यांनी मंजु-या दिलेल्या आहेत, त्यात कुठेही विरोध केलेला नाही असे असतांना कोपरगांव शहरवासियांना आपला नाकर्तेपणा लपविण्यांसाठी बारा दिवसाआड पाणीपुरवठा करून त्याला मुकसंमती देण्यांचे पाप नगराध्यक्ष विजय वहाडणे त्यांची मंडळी जाणुनबुजुन करत असल्याचे चित्र रंगविले जात आहे.
विधानसभा निवडणुकीच्या आधीपासून पाचव्या साठवण तळयाचे गाजर दाखवुन कोपरगांव शहरवासियांना एकीकडे झुलवत ठेवले, दुसरीकडे निळवंडे बंदीस्त पिण्यांच्या पाणी योजनेला न्यायालयाच्या आडुन अनेकांना अप्रत्यक्षरित्या सहकार्य करून ही योजना बासनात गुंडळण्यांचे पाप केले.
तर तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी 42 कोटी रूपये खर्चाच्या पाणी योजनेसाठी वाढीव साडेसात कोटी रूपयांचा निधी मंजुर करून आणूनही सत्ताधारी नगराध्यक्ष विजय वहाडणे व त्यांच्या बगलबच्च्यांच्या निश्क्रीयतेमुळे ही पाणी योजना रखडली परिणामी शहरवासियांना अजुनही पुरेशाप्रमाणांत पाणी मिळत नाही.
याला सर्वस्वी सत्ताधारी नगराध्यक्ष विजय वहाडणे हेच जबाबदार असुन ते आता वेडयाचे सोंग घेवुन पेडगांवला जात आहे. कोपरगांव शहरवासियांना आगामी काळात येणां-या सणासुदीच्या काळात नियीमत सुरळीत पाणीपुरवठा करता येउ शकतो.
पण शहरवासियांना विकासाच्या नावाखाली दाखविलेली सगळी स्वप्ने खोटी ठरायला लागल्यामुळे आमदार आशुतोश काळे हे आता नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना पुढे करून त्यांच्या नथीतुर तीर मारत आहेत त्यांच्या या कृतीचा जाहिर निषेध करते असेही त्या शेवटी म्हणांल्या.