तब्बल चार वर्षांनंतर खुनाचा गुन्हा दाखल !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- भिंगारमधील माेमीनगल्लीतील काटवनात झालेल्या मृत्यूचे गूढ चार वर्षांनंतर उकलले. रमेश ऊर्फ रमाकांत खबरचंद काळे (द्वारकाधीश काॅलनी, आलमगीर, भिंगार) याचा मृत्यू विषारी दारुमुळे झाला

असल्याचा अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे. या अहवालानुुसार भिंगार कॅम्प पाेलिसांनी चाैघांच्या विराेधात खुनाचा गुन्हा दाखल केला.

एकाला पाेलिसांनी अटक केली.भिंगार कॅम्प पाेलिस ठाण्याचे उपनिरीक्षक भय्यासाहेब देशमुख यांच्या फिर्यादीवरुन जावेद रऊफ शेख (माेमीनगल्ली) व अन्य तिघांच्या िवराेधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

जावेदला पाेलिसांनी अटक केली. २२ फेब्रुवारी २०१७ राेजी ही घटना घडली. मृत्यू झालेल्या रमेशच्या विराेधातही चाेरी व खुनासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

‘माझी बकरी मेली आहे, ती तुम्हाला देताे’, असे सांगत जावेदने रमेश व त्याची पत्नी वंदना यांना माेटारसायकलीवर बसवून काटवनात नेले. तेथे रमेशला बळजबरीने दारु पाजून मारहाण करण्यात आली.

नंतर त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.या प्रकरणी भिंगार कॅम्प पाेलिसांनी २२ फेब्रुवारी २०१७ ला अकस्मात मृत्यूची नाेंद केली.

पाेलिसांनी शवविच्छेदन करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून पुन्हा अहवाल मागवला हाेता. या अहवालात रमेशचा मृत्यू विषारी दारुमुळे झाल्याचे स्पष्ट झाले. भिंगार कॅम्प पाेलिसांनी स्वत: फिर्यादी हाेत चाैघांच्या विराेधात खुनाचा गुन्हा दाखल केला. चार वर्षांनंतर हा प्रकार उघड झाला.

अहमदनगर लाईव्ह 24