अहमदनगर मध्ये भंगारच्या दुकानामध्ये खून, आराेपीस अटक !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :- स्वयंपाक करत नाही, याचा राग आल्याने एकाचा खून करण्यात आला. केडगाव बायपास रस्त्यावरील उड्डाणपुलाजवळील लक्ष्मी स्क्रॅप मर्चंट या भंगार दुकानात ही घटना घडली. पाेलिसांनी एकाला अटक केली.

महेश शिवराम निसाद (२९, चिल्ला, उत्तर प्रदेश) असे आराेपीचे नाव आहे. बाबदिन झंडू निसाद (३९, चिल्ला, उत्तर प्रदेश) असे मृताचे नाव आहे. दुकानाचे मालक अशाेक रामस्वरूप निसाद यांच्या फिर्यादीवरून पाेलिसांनी गुन्हा दाखल केला.

दुकानात महेश व बाबादिन हे दाेघे कामगार होते. स्वयंपाक करत नाही, या क्षुल्लक कारणावरून महेशने बाबादिनशी वाद घातला. लाेखंडी गजाने त्याने बाबादिनच्या हाता-पायांवर मारले. त्यात बाबदिनचा मृत्यू झाला.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24