अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :-नगर तालुक्यातील बुऱ्हाणनगर, भिंगार परिसरात राहणारी तरुणी गीता व उर्फ गितांजली बाणेश्वर काळे, वय २३ वर्ष हिचा सन २०१७ मध्ये दोघा जणांनी डोक्यात मारून खून केल्याचे ४ वर्षानंतर म्हणजेच २०२१ मध्ये पोलिसांनी तपासातून उघड केले.
कानून क॑ हाथ लंब होते हे याची प्रचिती या तपासात दिसली. गीता काळे हिला १६.३.२०१७ रोजी ५ च्या सुमारास श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव फाटा परिसरात मृत्यू झाला होता.
या प्रकरणी भिंगार पोलीस स्टेशनला आकस्मित मृत्यू नोंदविण्यात आला होता. याप्रकरणी कसून तपास सुरू असताना तपासात पोलिसांना माहिती ‘मिळाल्यावरुन गीता काळे ही १६.३. १७ रोजी घारगाव फाटा येथे बसमधून उतरुन पायी जात असताना आरोपी दादा विठोबा कोकरे,
रा. लोणी व्यंकनाथ, ता. श्रीगोंदा, दिलीप भापकर, रा. बाणगाव, ता. श्रीगोंदा व एक अनोळखी इसम यांनी अडवून तुझी आई हिने माझ्यावर केलेली केस काढून घे, असे म्हणुन धमकावले.
तेव्हा गीताने त्यास नकार दिला. तेव्हा आरोपींनी तिच्या डोक्यात लाकडी दांड! मारुन, तिला जबरी जखमी केले. तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना २.४. १७ रोजी तिचा मृत्यू झाला.
पोउनि पंकज शिंदे यांच्या फिर्यादीवरून आरोपी दादा विठोबा कोकरे, दिलीप भापकर व एक अनोळखी तिघाविरुद्ध काल श्रीगोंदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.