‘नाजूक संबंधा’च्या संशयावरून तरुणाचा खून!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातल्यावडगाव सावताळा येथे राहणार तरुण अजित रावसाहेब मदने [वय २१] हा आरोपीच्या पत्नीशी फोनवर बोलतो तसेच त्याच्या गॅलरीमध्ये तिचे फोटो आहेत,

त्यांच्यात ‘नाजूक संबंध’ आणि प्रेमप्रकरण आहे, असा संशय घेऊन दोघांनी अजित रावसाहेब मदने या तरुणाला फोन करून बोलावून घेतले.

वडगाव सावताळ येथे वनजमिनीमध्ये आल्यानंतर आरोपी संतोब हरिभाऊ [रा. टाकळी ढोकेश्वर, ता. पारनेर], किरण बाळासाहेब जांभळकर [वय २६ रा. वडगाव सावताळ,

ता. पारनेर] या दोघांनी काहीतरी हत्याराने पाठीवर पायावर जबर मारहाण करून जीवे ठार मारून अजित मदने याचा खून केला. दि. १३ ते १४ जुलैदरम्यान वनजमिनीत हा निर्दयीपणे खून करण्यात आला.

मयताचे नातेवाइक भागाजी खंडू मदने, [धंदा : शेती, रा. वासुंदे बोकनवाडी, ता. पारनेर] यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार संतोष हरिभाऊ झावरे,

किरण बाळासाहेब जांभळकर या दोघांविरुद्ध भादंवि ३०२, ३४ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या दोघांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, खुनाच्या या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके, सपोनि गवळी यांनी घटनास्थळी भेट दिली. सपोनि वाघ पुढील तपास करीत आहेत.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24