अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- अकोले तालुक्यात उसन्या पैशांच्या वादातून बाचाबाची होऊन डोक्यात वीट मारल्याने एकजण ठार झाला. ही घटना शनिवारी उंचखडक खुर्द येथे घडली. तुकाराम बुधा उघडे (वय ६९) असे मृताचे नाव आहे.
कैलास यशवंत घोडके (४०) याला पोलिसांनी अटक केली. काही दिवसांपूर्वी घोडकेने उघडेकडे पैसे उसने मागितले. उघडेने नातेवाईकांकडून घेऊन दिले.
नातेवाईक मागणी करू लागल्यावर उघडेने घोडकेकडे तगादा लावला. घोडकेने रागाच्या भरात वीट उघडेच्या डोक्यात मारल्याने तो कोसळला.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com