अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी पाहता पोलीस यंत्रणेने आक्रमक पाऊले उचलणे गरजेचे होऊ लागले आहे. दिवसाढवळ्या मारहाण, खून अशा घटना घडू लागल्या आहेत.
तसेच जिल्ह्यातील या घटनांची आकडेवारीमध्ये चांगलीच वाढ होत आहे. नुकतेच बेलापूरात आणखी एका व्यावसायिकावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. एका इसमाने चाकूसारख्या धारदार हत्याराने वार केल्याने व्यापारी जखमी झाला आहे.
यामुळे हा व्यापारी प्रचंड दहशतीखाली वावरत आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, रामेश्वर पालीवाल हे बेलापूर येथे व्यवसाय करण्यासाठी आले होते. ते बेलापुरात भाडोत्री खोली घेऊन त्याने आपला व्यवसाय सुरू केला होता.
दोन दिवसापुर्वी बाहेरगावच्या एका व्यक्तीने पालीवाल यांना मारहाण केली. त्यानंतर दुसर्या दिवशी पुन्हा त्याच व्यक्तीने पालीवाल यांच्यावर धारदार शस्त्राने वार केला, त्यात पालीवाल यांना दोन तीन ठिकाणी जखमा झालेल्या आहे.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात रामेश्वर पालीवाल यांनी फिर्याद दाखल केली असता पोलिसांनी सचिन राऊत याचेविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.