अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- मिरजगाव येथील शेतजमीन बनावट महिला उभी करून खरेदी करण्यात आली. याप्रकरणी कर्जत पोलिस ठाण्यात आठ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
दोघांना अटक करण्यात आली असून यामध्ये आंबीजळगावच्या सरपंचांचा समावेश आहे. गट नंबर ६६/२ चे क्षेत्र २ हेक्टर ५१ आर या जमिनीची वारसा हक्काने पुण्यातील निर्मलाबाई हिराचंद ऊर्फ हिरालाल गांधी यांच्या नावावर नोंद आहे.
त्यांची तब्येत ठीक नसल्याने जमीन पडीक होती. ११ जानेवारी २० रोजी तलाठ्याचा गांधी यांना फोन आला. आपण शेतजमिनीची विक्री केली का? अशी विचारणा त्यांनी केली.
विक्री केली नाही असे सांगितल्यावर तलाठ्याने आपल्या शेतजमिनीचे खरेदीदस्त नोंदणीसाठी अासल्याची माहिती दिली. महिला आणि त्यांच्या मुलाने मिरजगावला येत शेतजमिनीच्या सर्व नकला ताब्यात घेतल्या.
१८ नोव्हेंबर २०१९ रोजी कर्जत येथील सब रजिस्टर कार्यालयात खरेदी घेणार म्हणून ज्ञानेश्वर शेषराव मोहिते (औरंगाबाद), प्रफुल्ल नेमीचंद तातेड (वाळुज), साक्षीदार म्हणून पुरुषोत्तम बाबुराव कुरूमकर (लिंपणगाव),
रुपेन बापू उबाळे (शिरूर), सचिन दीपक चौधरी (केडगाव), तर ओळख देणार म्हणून राजेंद्र भागूजी शेंडगे (शिवने), रवींद्र श्रीराम जाधव (औरंगाबाद) अशी नावे आहेत.
मूळ मालकाच्या जागी बनावट महिला उभी करून सुमारे ३२ लाख ४० हजारांची फसवणुकीची फिर्याद गांधी यांनी दिली. खरेदी घेणार, बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड कोणी बनवले, या सर्वांना गुन्ह्यात जबाबदार धरण्यात यावे. पोलिसांनी ज्ञानेश्वर मोहिते आणि पुरुषोत्तम कुरूमकर यांना अटक केली.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved