Ahmednagar News : भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाची नगर दक्षिण जिल्हा कार्यकारिणी जिल्हाध्यक्षा अश्विनी थोरात यांनी मंगळवारी (दि. ३०) पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जाहीर केली आहे.
या कार्यकारिणीत ६ उपाध्यक्षा, ५ सरचिटणीस, १० सचिवांसह ४३ पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
जाहीर करण्यात आलेल्या जिल्हा कार्यकारिणीत जिल्हाध्यक्षा-अश्विनी थोरात, उपाध्यक्ष मंगलताई ज्ञानदेव निमसे, रोहिणीताई अनिल फालके, मंगलताई हरिभाऊ कोकाटे, पंचशिला रमेश गिरमकर, रेखाताई संजय मते,
सिंधुताई वाणी, संघटन सरचिटणीस : अर्चना दिपक चौधरी, सरचिटणीस – स्मिता पांडुरंग लाड, महानंदा सुरसिंग पवार, प्रतिभा गणेश झिटे, अंजनाताई विश्वनाथ बांडे, विजया उल्हारे,
सचिव सुरेखा रमेश गोरे, स्वाती युवराज गाडे, उमाताई योगेंद्र होळकर, संगीता बजरंग घोडेकर, कमलताई विनायक खेडकर, मंगल हारकू मगर, नंदाताई चाबुकस्वार, विजया संजय उल्हारे, मंगलताई गवळी, मनीषा कचरू चौधरी, कोषाध्यक्ष स्वातीताई बेरड,
सोशल मिडीया प्रमुख – नमिता अण्णासाहेब शेटे. कार्यकारिणी सदस्य वैजयंती बाळासाहेब लगड, शारदा रमेश हंडाळ, ज्योती नवनाथ बांदल, सुनीता दत्तात्रय जामदार, रेखा लक्ष्मण डोंगरे, ज्योती प्रकाश जाधव, कविता संभाजी मगर, शालिनी माणिकराव काळे, स्मिता अक्षय लगड, छाया धनंजय शिंदे,
मंदाताई सुदाम गाजरे, मेनका बनसवडे, पल्लवी नितीन काळे, अलका सुभाष शिंदे. श्रीगोंदा मंडल अध्यक्ष देवयानी शिंदे, शेवगाव मंडल अध्यक्ष : आशाताई गरड, पाथर्डी मंडल अध्यक्ष : काशीबाई गोल्हार, कर्जत मंडल अध्यक्ष : प्रतिभा रेणुकर, पारनेर मंडल अध्यक्ष: संध्याताई शेळके, राहुरी मंडल अध्यक्ष मीरा अशोक धाडगे यांचा समावेश आहे.
यावेळी भाजपाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब सोनवणे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रमेश पिंपळे, कोषाध्यक्ष दादासाहेब बोठे, गणेश भालसिंग, अॅड. विवेक नाईक, डॉ. अजित फुंदे, शामराव पिंपळे, सागर भोपे, सुभाष शिंदे, सचिन कुसळकर, दत्तात्रय थोरात, विश्वास रोहोकले, अशोक धाडगे, विद्याताई शिंदे, युवराज पोटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.