नगर जिल्ह्याला 85 कोटींचा निधी येणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:- राज्यातील ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषदांसाठी पंधराव्या वित्त आयोगातून आणखी 1456 कोटी 75 लाख रूपयांच्या बेसिक गँटच्या (अनटाईड) दुसर्‍या हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे.

यात नगर जिल्ह्याच्या वाट्याला 85 कोटी 39 लाख 67 हजारांचा निधी येणार आहे. पहिल्या टप्प्यातही एवढाच निधी प्राप्त झालेला आहे. या निधीचा वापर करत गावांत चांगल्या दर्जाच्या पायाभूत सुविधांची निर्मिती करावी लागणार आहे.

राज्य सरकारच्या बारा विविध विभागांकडून ग्रामपंचायतींना निधी दिला जातो. आतापर्यंत नगर जिल्ह्याला 170 कोटी 79 लाख 34 हजारांचा निधी प्राप्त झालेला आहे. नवनियुक्त सरपंचांच्या दृष्टीने ही खुशखबर आहे.

कारण त्यांची नियुक्ती होताच त्यांच्या हाती मोठ्या प्रमाणात निधी येणार आहे. त्यातून त्यांना गावचा विकास साधता येणार आहे. राज्याच्या वार्षिक बजेटमध्ये जिल्हा परिषद,

पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कामांसाठी 22 हजार कोटींचा तरतूद आहे. बदललेल्या निकषांनुसार वर्षातील 10 टक्के निधी जिल्हा परिषदेला, 10 टक्के निधी पंचायत समितीला मिळतो तर उर्वरित निधी ग्रामपंचायतीला दिला जातो.

अहमदनगर लाईव्ह 24