अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- दिवंगत नेते अनिल भैय्या राठोड यांचे निधन झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच शहरातील शिवसेनेमधील गटबाजी उफाळून आली आहे. दरदिवशी आरोप- प्रत्यारोप होण्याचे प्रमाण वाढले आहे.
आता हे प्रकरण थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारात जाऊन पोहचले आहे. नगरमध्ये शिवसेना पक्षात गटातटाचे राजकारण सुरू राहिल्यास शिवसेनेला याची मोठी किंमत मोजावी लागेल.
अजूनही वेळ गेलेली नाही, वेळीच वरिष्ठांनी लक्ष घालावे, असे पत्रच आता युवासेनेचे शहरप्रमुख हर्षवर्धन कोतकर यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना पाठवले आहे.
या पत्रात कोतकर यांनी म्हंटले आहे कि, महापालिकेतील स्थायी समिती सभापती तसेच स्वीकृत नगरसेवक निवडीवरून नगरच्या शिवसेनेतील गटबाजी उफाळून आली आहे. दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
महापालिकेत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या शिवसेनेला भाजप-राष्ट्रवादीच्या राजकारणामुळे सत्तेपासून दूर राहावे लागले, हे स्पष्ट केले आहे.
तसेच शिवसेनेला महापालिकेत विरोधी पक्षनेते पद मिळाले नाही. मनपा स्थायी समितीचे सभापतीपद सुद्धा शिवसेनेला मिळाले नाही, असे म्हंटले आहे.
शिवसेनेत अंतर्गत गटातटाचे राजकारण सुरू झाल्याने शिवसेनेची ताकद विखुरली जात आहे. याचा फायदा विरोधक उठवत आहेत.
भविष्यातही असेच गटातटाचे राजकारण सुरू राहिल्यास शिवसेनेला याची मोठी किंमत मोजावी लागेल. राजकारणातील दुफळी रोखण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून हालचाली कराव्यात. असेही कोतकर यांनी पाठवलेल्या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved