शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ भारत बंदसाठी नगर तालुका युवक काँग्रेस उतरली रस्त्यावर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-जगाचा पोशिंदा शेतकरी मायबाप संकटात सापडला आहे केंद्राच्या जुनी सरकारने शेतकर्‍यांच्या आंदोलनाकडे आत्तापर्यंत दुर्लक्ष करून या देशाच्या कोट्यावधी शेतकऱ्यांचा अवमान केला आहे.

आज सबंध देश हा पेटून उठला आहे नगर तालुका युवक काँग्रेस या देशातल्या कोटदी शेतकऱ्यांसाठी महिन्यात उतरली आहे असे प्रतिपादन तालुका अध्यक्ष ॲड.अक्षय कुलट यांनी केले आहे.

महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशध्यक्ष सत्यजित दादा तांबे यांच्या नेतृत्वाखाली तसेच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके, नगर तालुका अध्यक्ष संपतभाऊ म्हस्के, रावसाहेब पाटील शेळके,

नगर शहर जिल्हा अध्यक्ष किरण काळे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितलभैय्या वाबळे, जिल्हा दक्षिण कार्याध्यक्ष राहुलभाऊ उगले यांच्या मार्गदशनाखाली शेतकरी विरोधी कायद्याचा नगर तालुका युवक काँग्रेसच्या वतीने नगर-कल्याण रोडवर रास्ता रोके करीत निषेध करण्यात आला.

या वेळी नगर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष अँड अक्षय कुलट यांच्यासह खातगावचे माजी सरपंच अल्लाबक्ष शेख, सरपंच मिठुशेठ कुलट, गौरव नरवडे, सागर सातपुते, भाऊ नरवडे, संकेत नरवडे, सचिन नरवडे, शिशाबाप्पू कुलट, सचिन कुलट, शेतकरी बांधवांचे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24