Ahmednagar News : सर्व सार्वजनिक गणेश मंडळांना पोलिस प्रशासनाची परवानगी घेणे गरजेचे आहे. गणेश मंडळांना ऑनलाइन परवानगी देण्यात येत आहे. तालुक्यातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी ऑनलाइन अर्ज दाखल करून गणेश मंडळांचा परवाना काढून घ्यावा.
जर काही अनुचित प्रकार घडल्यास त्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर व अध्यक्षावर कायदेशीर कारवाई केली जाईल. असा इशारा नगर तालुका पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी दिला आहे.
थोड्याच दिवसात गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी परवानगी आवश्यक असून, उत्सव साजरा करताना कुठल्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये म्हणून प्रशासनाने जाहीर केलेले नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.
प्रत्येक मंडळाने उत्सव साजरा करण्यापूर्वी परवाना घेणे आवश्यक आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांनी कायद्याचे पालन करून गणेशोत्सव साजरा करावा. अनुचित प्रकार घडल्यास त्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर व अध्यक्षावर कायदेशीररित्या कारवाई केली जाईल.
त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांनी परवानगी काढून घ्यावी. तसेच प्रशासनाच्या सर्व सूचनांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी केले आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नगर तालुका, भिंगार कॅम्प तसेच एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावागावांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी. या उद्देशाने तालुक्यातील संवेदनशील असलेल्या अरणगाव, वाळकी व वडगाव गुप्ता या गावात
संपतराव भोसले, नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप, भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनकर मुंडे
यांच्यासह पोलिस ठाण्यातील पथकाने वाळकी व वडगाव गुप्ता या गावात मुख्य रस्त्यांवरून संचलन केले. यावेळी पोलिसांकडून ग्रामस्थांना कायदा सुव्यवस्थेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.