अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :- राजेंद्र नागवडे यांना गर्व झाला असून ते गुर्मित आहेत. कारखाना निवडणुकीत पैश्याच्या जोरावर सभासदांना विकत घेण्याचे नियोजन नागवडे यांनी केले आहे.
मात्र त्यांनी कितीही पैश्याच्या जोरावर निवडणुक लढविण्याचे ठरविले तरी ते शक्य होणार नाही.अशी टीका माजी मंत्री आ.बबनराव पाचपुते यांनी काष्टी येथील प्रचार सभेत केला.
श्रीगोंदा तालुक्यातील नागवडे कारखाण्याची निवडणूक रणधुमाळी सुरू आहे असून, एकमेकांवर जोरदार टीका टिप्पणीकेली जात आहे. त्यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
या वेळी बोलताना आ.पाचपुते म्हणाले की स्व. शिवाजी बापू हयात असताना त्यांचा काटकसरीचा कारभार होता म्हणून सभासद त्यांच्या पाठीशी होते.
पण स्व.बापूंच्या नंतर त्यांचे सहकारी माजी व्हा.चेअरमन केशवभाऊ मगर यांनी कारखाना अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांचा कारखान्यात चाललेला गैर कारभाराचा प्रताप माझ्या समोर मांडल्यानंतर माझ्या सह कार्यकर्त्यांचे डोळे पांढरे झाले.
त्याच वेळी सर्वांनी निर्णय घेतला की नागवडे कारखान्याची निवडणुक पूर्ण ताकतीने लढवत मागील पंचवार्षिक निवडणुकीचा वचपा काढू.
मगर म्हणाले की मी घराचा आर्थिक दृष्टया सक्षम आहे मला पदाची अपेक्षा नाही २५ वर्ष स्व. बापू बरोबर मी खांद्याला खांदा लावून काम केले परंतु नंतरच्या गैरकारभाराचे पाप माझ्या माथी लागू नये ही निवडणूक लढवत आहे असे म्हणाले.